कैवल्यधाम
माझा जन्म दादर शिवाजीपार्क येथील दिवेकर हॉस्पिटल मध्ये झाला. माझे बालपण माझ्या आजोळी गेले ,शिवाजी पार्क येथील तेव्हाच्या शिवाजी पार्क रोड नंबर ३ येथे कैवल्यधाम नावाची एक सुरेख बिल्डिंग होती , ह्या बिल्डिंगचे मालक होते बोनगाळे कुटुंब प्रमुख काका बंगले ह्या नावाने ओळखले जात ,हि इमारत दोन मजली होती ,ह्या दोन मजली इमारतीत सर्वात वरच्या दुसऱ्या मजल्या वर मालक राहायचे ,पहिल्या मजल्यावर गुब्बी आणि शिवतरकार आणि तळ मजल्यावर आम्ही बोरकर आणि पालेकर अशी पाच कुटुंबे राहायची ,हि सुशीक्षीत आणि सुस्थित कुटुंबे तत्कालीन मध्यम वर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करत होती . आमची शाळा बालमोहन विद्यामंदिर उर्फ दादा मास्तरांची शाळा केवळ पाच पावलांवर आहे , ह्या शिवाजीपार्क परिसरातली बहुतेक कुटुंबे दादांशी एक भावनिक जवळीक साधून होती ,दादांच्या शाळेत मूळ गेले कि आई वडिलांची अर्धी जवाबदारी गेली असं लोकांना वाटायचे आणि ते खरंच होते आमच्या कैवल्यधाम मधली बहुतेक मुले ह्याच शाळेत शिकली आणि मोठी झाली माझा मामा वसंत मामा, कुमारदादा ,जयश्रीताई ,शैलामावशी ज्योत्स्ना मावशी आणि मी ...