पोस्ट्स

मार्च, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कैवल्यधाम

माझा जन्म दादर शिवाजीपार्क येथील दिवेकर हॉस्पिटल मध्ये झाला.   माझे बालपण माझ्या आजोळी गेले ,शिवाजी पार्क येथील तेव्हाच्या  शिवाजी पार्क रोड नंबर ३ येथे कैवल्यधाम नावाची एक सुरेख बिल्डिंग होती , ह्या बिल्डिंगचे मालक होते  बोनगाळे  कुटुंब प्रमुख काका बंगले ह्या नावाने ओळखले जात ,हि इमारत दोन मजली होती ,ह्या दोन मजली इमारतीत सर्वात वरच्या दुसऱ्या मजल्या वर मालक राहायचे ,पहिल्या मजल्यावर गुब्बी आणि शिवतरकार आणि तळ मजल्यावर आम्ही बोरकर आणि पालेकर अशी पाच कुटुंबे राहायची ,हि सुशीक्षीत आणि सुस्थित कुटुंबे तत्कालीन मध्यम वर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करत होती . आमची शाळा बालमोहन विद्यामंदिर उर्फ दादा मास्तरांची शाळा केवळ पाच पावलांवर आहे , ह्या शिवाजीपार्क परिसरातली बहुतेक कुटुंबे दादांशी एक भावनिक जवळीक साधून होती ,दादांच्या शाळेत मूळ गेले कि आई वडिलांची अर्धी जवाबदारी गेली असं लोकांना वाटायचे आणि ते खरंच होते आमच्या कैवल्यधाम मधली बहुतेक मुले ह्याच शाळेत शिकली आणि मोठी झाली माझा मामा वसंत मामा, कुमारदादा ,जयश्रीताई ,शैलामावशी ज्योत्स्ना मावशी आणि मी ...

चेड्याचे फेणे

इमेज
-चेंडयाचे फेणे तोडूर ,बिणगे ,चेंडये ,अर्गे ,अवरसे ,हि कारवारच्या जवळची संपन्न खेडी ,भरपूर भात  शेती ,नारळी  फोफळी,आंबे ,फणस ,काजू ,कोकम आणि वटंबाची ,झाडे  यांनी हा प्रदेश झाकलेला होता ,त्याकाळातल्या संपन्नतेची  जी मोजमापे होती ती ओसंडून वाहणारी संपन्नता शेणैच्या घरात वाहायची ,शणै प्रदेशाचा राजा ,मुल्क खुदाका ,खुलक कंपनीका आणि अंमल  शेणैका  अशी अवस्था होती ,घराण्यात  शानभोगी  किंवा मामलतदारी  अथवा  सरकारी पदवी असली तर घराण्याचा मोठेपणा निर्विवाद असायचा ,त्यांचा उल्लेख  "मोठ्ठ घराणे ते "म्हणून केला जायचा ,अशी अनेक घराणी  ह्या परिसरात होती ,पुरुष शेती गाव आणि गावाचे राजकारण ह्यात मग्न असायचे आणि  स्त्रीया आंगण ,परसू ,नोकरचाकर ,अंगावरचे मण भराचे दागिने , वार्षिक सणवार ,आणि बाळंतपणे ह्यात मग्न असायच्या  हि अशी परिस्तिथी   होती . काळ बदलत होता ",उत्तम शेती ,माध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "ह्या म्हणीचा क्रमवार  पूर्ण बदलला ,नोकरीचे महत्व वाढले ,इंग्रजी शिक्षणाने सामाजिक गरजा  आणि...