पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पंचकन्या

इमेज
आठवणींचा कॅलिडोस्कोप माणसाच्या मनात नेहमीच उजळत असतो ,काही काही माणसांच्या  आठवणी मनात एवढ्या घट्ट घर करून बसलेल्या असतात ,की  त्या नकळत तुम्हाला भूतकाळाच्या गोधडीची उब जाणवून देतात  एका अशाच कुटुंबाची आठवण आज मनात दाटून येते आहे ,बालपणी मनात दाटलेल्या आणि  आजही उजळणाऱ्या  त्या आठवणी हेच  आपले फिक्स  DIPOSIT   त्याच्या वरचे व्याज कधीही एनकॅश  करता येते.  हि आठवण आहे एका सुसंस्कृत प्रेमळ आणि प्रगत कुटुंबाची गंडभिर  कुटुंबाची. त्यांची आठवण आली आणि नकळत ओठांवर पंचकन्यांच्या महतीचा श्लोक   आला , काशिनाथ गंडभीर हे माझ्या आईच्या मावशीचे कावाक्का चे जेष्ठ जावई. गंडभीर  मंडळी कारवार जिल्ह्यातल्या  कणसगिरी  गावची  कन्येचे नाव आवडू ,नावा  प्रमाणे सर्वप्रिय व्यक्तिमत्व ,माझ्या आठवणीतले "काशभावजी  आणि आवडूताई ,एक प्रेमळ कुटुंब ,त्यांचे आणि माझे नाते  काय ,कसे लांबचे कि जवळचे हे प्रश्न  कधीही मनात आले नाही तेव्हाही आताही ,अजूनही एकाच ओळ  ओठावर येते ती ते आमचे काशभावजी आणि ती आ...