अप्पाक्का आणि आजोबा
तोडूर कारवार जिल्ह्यातले एक खेडे ,त्या खेड्यात एक जमीनदार घराणे होते पालेकर ,नजरेच्या टप्प्यात येणार नाहि एवढी जमीन ,आणि आणि निसर्गाने भरभरून दिलेले शेती उत्त्पन्न ,जमीनदारांचे नाव गणपत पालेकर ,गणपत पालेकर हे माझ्या आजीचे वडील,आणि आईचे नाव होते ..... ती ....च्या ....मुलगी. त्यांना चार मुलगे आणि पाच मुली होत्या , मुलांची नावे "बाळकृष्ण (मोठे मामा), भवानीशंकर (पुतुमामा ) ,देविदासमामा ,आणि विश्वनाथ मामा ,आणि मुली ,सावित्री(सावाक्का )कावेरी(कावाक्का),अप्रुपे(अपाका ),नर्मदा(नमाक्का ),अंबा(अंबाक्का ). अपाका माझी आजी आणि आजोबा रामचंद्र बोरकर ,माझे आजोबा हिंदू हायस्कुल मध्ये शिक्षक होते ,त्यांच्या बरोबर णूनमास्तर आणि धिम्मास्तर नावाचे त्यांचे दोन सहकारी होते ,हे तिघे संस्थापक वर्गाचे मुख्य हि शाळा ,सहकारी ,हिंदू हायस्कुल हे सरकारी शाळेला एक स्वदेशी पर्याय समाजाला जात होता , मंतरलेले दिवस होते ते ,कुठल्याना कुठल्यातरी ध्येयाने माणसे वेडावला होती ,शिक्षक मनापासून मुलांना शिकवत शिक्षकी हा पेशा होता धंदा नव्हता ,शिक्षकांना ज्ञा...