अप्पाक्का आणि आजोबा

तोडूर  कारवार जिल्ह्यातले एक खेडे ,त्या खेड्यात एक जमीनदार घराणे होते  पालेकर ,नजरेच्या टप्प्यात येणार नाहि एवढी जमीन ,आणि  आणि निसर्गाने भरभरून दिलेले शेती उत्त्पन्न ,जमीनदारांचे नाव गणपत पालेकर ,गणपत पालेकर हे माझ्या आजीचे वडील,आणि आईचे नाव होते ..... ती ....च्या  ....मुलगी. त्यांना चार मुलगे आणि पाच मुली होत्या ,
मुलांची नावे "बाळकृष्ण (मोठे मामा), भवानीशंकर (पुतुमामा ) ,देविदासमामा ,आणि  विश्वनाथ  मामा ,आणि मुली ,सावित्री(सावाक्का )कावेरी(कावाक्का),अप्रुपे(अपाका ),नर्मदा(नमाक्का ),अंबा(अंबाक्का ).

अपाका माझी  आजी  आणि आजोबा रामचंद्र बोरकर ,माझे  आजोबा हिंदू हायस्कुल  मध्ये शिक्षक होते ,त्यांच्या बरोबर णूनमास्तर आणि धिम्मास्तर नावाचे त्यांचे दोन सहकारी होते ,हे तिघे संस्थापक वर्गाचे मुख्य हि शाळा  ,सहकारी ,हिंदू हायस्कुल हे सरकारी शाळेला एक स्वदेशी पर्याय समाजाला जात होता ,

मंतरलेले दिवस होते ते ,कुठल्याना कुठल्यातरी ध्येयाने माणसे वेडावला होती ,शिक्षक मनापासून मुलांना शिकवत शिक्षकी हा पेशा होता धंदा नव्हता ,शिक्षकांना ज्ञानमहर्षी ,वगैरे उपाध्या सोडा पगारही वेळेवर मिळत नव्हता ,क्लास अथवा शिकवणी सारखे पर्याय उपलब्ध नव्हते शिक्षक  गुरु होते पोटभरू नव्हते ,
हिंदू हायस्कुल मधून नामवंत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले किंबहुना त्या शाळेतले विद्द्यर्थी पुढे आपल्या क्षेत्रात चमकले ,स्वच्छ चारित्र्य ,अभ्यासूवृत्ती ,आणि अथक  मेहनत ,ह्या कवच कुंडलाना लेउनच हे समाजाचे भविष्य घडवायला आपापल्या क्षेत्रात उतरले ,आणि आपली एक ओळख दाखवून गेले ,त्याची केवळ आठवण करणे म्हणजे विष्णुसहस्त्र नामाच्या पठाणाचे पुण्य संपादन करण्या सारखेच ठरेल ,सर्वोच्य न्यायालयाचे  माजी न्यायमूर्ती देविदास पालेकर ,रिजर्व ब्यांकेचे माजी डेप्युटी कमिश्नर शी बी डी कसबेकर,भारत सरकारचे  माजी उच्चपदस्थ अधिकारी आणि श्री प्रभाकर कसबेकर ,त्याची बहीण आणि ख्यातनाम \प्राध्यापिका सौ मीराताई  पालेकर,श्री  यार्दी ,एस टी महामंडळाचे संचालक पु गो साळवी ,सेवादलाचे श्री रामदास फेणे ,अशी अनेक नावांतून मला माहित असणारी काही नावे . ह्यांना शाळेने  घडवले आणि ह्यांनी समाजाच्या घडवणुकीत मोठे  योगदान दिले . माझी आजी अप्पाका  हि एका जमीदारची मुलगी  पण एका  शिक्षकाची पत्नी झाली  माहेरी धनधान्याची  संपन्नता होती पण सासरी विचाराची. "माग तर भीक नाहीतर मास्तरकी  शीक "असे समजणारा समाज नव्हता . मास्तरांना गुरुपद प्राप्त झाले होते ,विद्यार्थी हि शिक्षकाची जवाबदारी आहे ,असे शिक्षक मानत ,समजत आणि तसे वागतही.

माझे आजोबा  अतिशय  शांत स्वभावाचे होते कमी बोलणे ,नेमकेच खाणे आणि सतत वाचत राहणे अशी त्यांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे. आजी मात्र अतिशय बोलक्या   स्वभावाची होती , तिचा स्वभाव नुसता बडबड्या नव्हता तर बोलून दुसऱ्याशी  जवळीक साधायची तिची हातोटी  वाखाणण्याजोगी होती ,विचाराची स्पष्टता ,प्रगतिशील असूनही सामाजिक तत्कालीन रीती रीवाजांना  सांभाळून  कोणालाही न दुखावता संबंधितांना विश्वासात  घेऊन कुठल्याही प्रश्नांची उकल तिला करता येत होती ,अतिशय प्रगत विचाराची ,देवावर शतप्रतिशत श्रद्धा असूनही अंधश्रद्धेपासून ती लांबच राहायची ,अनेक वादविवादात ,मग ते ,नवरा बायकोतले असोत ,भावाभावातले असोत कि बाप मुला तले असोत ते सोडवायला  आणि तेही यशस्वीरीत्या, ती कायमच लवादाचेच

काम करायची  तेही  दोघांनाही जोडणारे ,तोडणारे नव्हे . तिचा  शब्द हा शेवटचा ठरायचा ,त्यात धाक नसायचा  पण   तिच्यावररच्या विश्वासाची,ती एक पोच पावती असायची

 तिच्या    अचाट कर्तृत्वाची कसोटी नियतीनेही घेतली ,तिची धाकटी बहीण तीन लहान मुलांना सोडून  देवाघरी गेली  ,एक मुलगा , दोन मुली ,आणि एक साधा सरळ सोट नवरा ,त्या नवऱ्याचे तर सगळेच विसकटले होते  घर संसार  चालायचा तरी कसा, दोन मुली होत्या त्यांना वाढवायचे होते ",मुलींना वाढवणे" ह्या सदराखाली  बऱ्याच गोष्टी  त्या वेळी अंतर्भूत असायच्या ,त्यांना शिकवणे ,मोठे करणे ह्याही पेक्षा त्यांचे लग्न करून देणे हा अंतिम टप्पा महत्वाचा ठरायचा  आणि त्या अंतिम टप्प्याच्या अनुषंगानेच सर्व विचार व्हायचे ,मुली सासरी गेल्या कि आपल्या कर्तव्याची इतिश्री झाली आणि आता आपण मोकळे झालो  हा सर्व मान्य विचार होता ,आणि मुलींना नीट सांभाळायला हवे ,डोळ्यात तेल घालून  त्यांचे  संगोपन  करायला हवे ,शिस्त लावायला हवी नाही तर त्या वाईट मार्गाला लागतील
अशी एक अनामिक भीती होती आणि हे काम  फक्त एक स्त्रीच करू शकते असा दृढ  विश्वास हि होता . घरातल्या  पुरुष्याच्या जाण्याने  बैठक हलायची पण स्त्रीच्या जाण्याने सार घरच विस्कटायचे  ,ते घर सावरायला एका स्त्रीचीच जरुरी होती  कारण त्या घरात  फक्त मुलगाच नव्हता  तर ,दोन लहान मुलीहि होत्या ,अंबाच्या निधनाने  अप्पाकाला  निवृत्तीचा भोज्याला हात लावूनच परतावं लागले ,"पुनश्च हरी ओम "म्हणत संसाराच्या रामरगाड्यात जुंपून घ्यावे लागले  निवृत्तीचे वेध लागत लागत संसाराचा दुसऱ्या अंकाची घंटा वाजली. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे

इंदुताई आणी गुरुदास मामा