पंचकन्या
आठवणींचा कॅलिडोस्कोप माणसाच्या मनात नेहमीच उजळत असतो ,काही काही माणसांच्या आठवणी मनात एवढ्या घट्ट घर करून बसलेल्या असतात ,की त्या नकळत तुम्हाला भूतकाळाच्या गोधडीची उब जाणवून देतात
एका अशाच कुटुंबाची आठवण आज मनात दाटून येते आहे ,बालपणी मनात दाटलेल्या आणि आजही उजळणाऱ्या त्या आठवणी हेच आपले फिक्स DIPOSIT त्याच्या वरचे व्याज कधीही एनकॅश करता येते.
हि आठवण आहे एका सुसंस्कृत प्रेमळ आणि प्रगत कुटुंबाची गंडभिर कुटुंबाची. त्यांची आठवण आली आणि नकळत ओठांवर पंचकन्यांच्या महतीचा श्लोक आला
,
,
काशिनाथ गंडभीर हे माझ्या आईच्या मावशीचे कावाक्का चे जेष्ठ जावई. गंडभीर मंडळी कारवार जिल्ह्यातल्या कणसगिरी गावची कन्येचे नाव आवडू ,नावा प्रमाणे सर्वप्रिय व्यक्तिमत्व ,माझ्या आठवणीतले "काशभावजी आणि आवडूताई ,एक प्रेमळ कुटुंब ,त्यांचे आणि माझे नाते काय ,कसे लांबचे कि जवळचे हे प्रश्न कधीही मनात आले नाही तेव्हाही आताही ,अजूनही एकाच ओळ ओठावर येते ती ते आमचे काशभावजी आणि ती आमची आवडूताई ,दादर स्टेशन जवळच्या चेरी व्हू नावाच्या इमारतीत ते राहायचे ,मी जेव्हा आजोळी शिवाजी पार्कला राहत होतो तेव्हा त्यांच्याकडे मी आजी बरोबर जायचो ,घर रेल्वे लाईनला लागून होते ,त्यामुळे ग्यालरीत उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या बघत राहणं फार मजेचे वाटायचे ,वेळ कसा जायचा ते कळायचेच नाही ,
ह्या कुटुंबात पाच क न्या जन्माला आल्या ,आणि तथाकथित एक हि कुलदीपक मुलगा नव्हता,पण आई वडलांच्या दोघांच्याही चेहऱ्यावर सुख आणि समाधानाचे माप ओसंडत असायचे ,सर्व मुली अतिशय हुशार सुसंकृत आणि प्रेमळ ,त्यांच्या बोलण्यात एक आत्मविश्वास ,नम्रता ,हातात हात घालून वावरताना दिसायची ,
ज्या काळात मुलगी होणे हि आपत्ती समजली जायची त्या काळात हे गंडभीर कुटुंब सुखी माणसाचा सदरा घालून वावरत होते ,पाचीही कन्यांचे संगोपन,शिक्षण आणि संवर्धन अतिशय आनंदाने त्यांनी केले ,मुलीही खऱ्या अर्थाने दुहिता ठरल्या ,सुखी माणसाच्या सदऱ्याचे महावस्त्र लेऊन आल्या होत्या ,ज्या ज्या घरात गेल्या तिथे सगळ्यांना आपलेसे केले ,माहेर आणि सासरचे नाव उज्ज्वल केले ,त्यांची थोडक्यात नावानिशी ओळख करून दिली नाही तर माझे मलाच चुकल्या सारखे वाटेल.
जेष्ठ कन्या इंदुमती उर्फ इंदुताई ,माझ्या आईची सर्वात जवळची,लाडकी मैत्रीण ,माझ्या एका लेखात मी सविस्तर माहिती त्यात दिली आहे
दुसरी मुलगी सिंधू सिंधुताई तिचे लग्न मारुती तेलंग ह्यांच्याशी झाले 'तिला तीन अपत्ये एक डॉक्टर गिरीश आणि दुसरं मुलगी शुभदा आणि सीमा ,सिंधुताईंचे वर्णन मी फक्त दोनच शब्दात करतो प्रेमळ आणि हसतमुख ,माहेरचा सुखी माणसाचा सदरा तिने कायमचा पांघरला होता ,सुख आणि दुःखात कधीही ,चेहऱ्यावरची प्रसन्नता आटली नाही ,नावाप्रमाणेच अपार आणि अथांग ,कधीही ना आटणारा प्रेमाचा मायेचा झरा कायम चेहऱ्यावर आणि शब्दात वाहत असायचा आज सिंधू ताई नाही पणतिचा प्रेमळ आवाज ,चेहरा आणि आठवणी अजूनही आहेत सुखद ,आणि उबदार. आपले आयुष्य फक्त आपल्या जगण्यासाठीचा नव्हे तर इतरांना जगवण्या साठी असते ,हा पक्का निर्धार करून ह्या माउलीने मूक बधिर शाळेत काम करून अनेक मूक व्यक्तींना मनाने बोलके केले ,सिंधुताई तुझी आठवण हे पुण्यस्मरण आहे ,अनेक स्तोत्राचे आणि मंत्राचे बळ ह्या पुण्यस्मरणात नक्कीच आहे.
तिसरी मुलगी शालिनी आमच्या भाषेत शालीताई ,हाडाची शिक्षिका ,जोगेश्वरीतल्या प्रसिद्ध वाघ घराण्यात श्री अच्युत वाघांशी तिचे लग्न झाले , ख्यातनाम शिक्षिका ,अनेक विद्यार्थ्यांना शिकवले घडवले ,पण अल्पवयात तिचे निधन झाले ,प्रकाश हेमांगी ,देवदत्त या तीन मुलांना आणि आमच्या अच्युत भावजींना सोडून ती देवाघरी गेली ,आज अच्युत भावजीही नाहीत ,आहेत फक्त त्या सुखद आठवणी.
डॉक्टर शकुंतला शकुताई हि चौथी मुलगी ,तिचा विवाह डॉक्टर दडकर ह्यांच्याशी झाला आणि त्यांचे निधन चीन मध्ये अल्पवयात झाले शकुताई अजूनही कार्यरत आहे ,गंडभीर घराण्याची बहुजन सुखाय बहुजन हिताय हि दिंडी खांद्यावर घेऊन आपली कर्तव्ये पार पडत आहेत .
शेंडेफळाचे नाव सरला ,यार्दी एक ख्यातनाम फिजिओथेरपिस्ट ,काम तेच माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या साठी काहींना काही करत राहावे हि घराण्याची परंपरा कायम राखून आहे.
माझ्या ह्या लेखाचे कारण फक्त माहिती देण्याचे नाही तर हे एक पुण्यस्मरण आहे ,पुण्यस्मरण आहे त्या दोघं माता पित्याचे ,ज्या दोघांनी मुलींचे संगोपन ,शिक्षण प्रेमाने केले ,आज फक्त बेटी बचाव बेटी पढाव च्या घोषणा होताहेत ,पण ज्या काळात मुलीचा जन्म हा आपत्ती समजली जायची त्या काळातही मुलींना सक्षम आणि समर्थ केले ,त्या दोघांचे मोठेपण आज जाणवत ,ह्यांनी कोणाकडून घेतली असेल हि प्रेरणा, उत्तर एकच देव माणूस ,मानवी जन्म घेऊनही दैवी गुण दाखवणार्यांना काय म्हणायचे देव माणूसच ना ,
त्याची उंची मोजणारे मोजमाप अदृश्य आहे पण तरीही अढळ आहे.
शशांक रांगणेकर
9821458602
