माझी जयश्री ताई
परमेश्वर हा चौसष्ट कलांचा निर्माता आहे ,चित्रकला हि एक प्रमुख कला आहे ,चित्रकार म्हणून उत्तमोत्तम चित्र रेखाटतो ,मन लावून तो चित्र काढतो ,त्या उत्तमोत्तम चित्रातले एक चित्र म्हणजे माझी जयश्री ताई ,हा परमेश्वर तसा मोठा मुडी कलाकार आहे ,कधी कधी आपल्या ह्या कामाला तो कंटाळतो आणि माझ्यासारखी व्यंगचित्र काढून पृथीवर पाठवतो. जयश्री ताईच्या आठवणी म्हणजे एक लखलखीत बुद्धिमत्तेची आठवण ,तिचा बालमोहनची विद्यार्थिनी ते मुंबई विद्यापीठाची स्नातक म्हणून केलेला प्रवास असाच पावला पावलावर आपल्या अजोड बुद्धिमत्तेची जाणीव करून देणारा होता ,शालेय शिक्षणात नेहमीच अग्रक्रमी राहूनही ती पुस्तकी किडा म्हणून कधीच राहिली नाही ,चिव चिव करणारी चिमणी म्हणून कधीच वावरली नाही ,तिची आवड निवड गरुड झेपेचीच होती ,मराठी ,इंग्लिश,आणि संस्कृत ,ह्यातिन्ही भाषांवर तिचे प्रभुत्व होते ,अभ्यासाचे एकही क्षेत्र नव्हते कि तिला माहित नव्हते ,उत्तम संस्कार ,आणि आणि बहुश्रुत बुद्धिमत्तेच्या पायावर ठाम पणे ती उभी होती , तिच्या आत्म विश्वासाला तोड नव्हती ,जे जे चांगले आहे स...