पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

इंदुताई आणी गुरुदास मामा

इमेज
साठीचे  दशक ,  आईच्या नावाने एक पोस्टकार्ड न चुकता  मकरसंक्रांतीच्या आसपास  यायचे ,तेव्हा पत्रव्यवहार फक्त  प्रथमपुरुषीएकवचनानेच  व्हायचा , पण आईला येणारे हे पोस्टकार्ड  मात्र सौभाग्य लेणी लेउनच मिरवायचे., "अमुक अमुक दिवशी आमच्या कडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम योजला आहे तरी आपणआपल्या मैत्रिणी लेकी सुना ह्यांना घेऊन जरूर यावे  आपली नम्र "सौइंदुमती गुरुदास  फेणे.ते पत्र  काही माझ्या संग्रहि  नाही पण  आठवणीत मात्र   कायमचे आहे .आजच्या  मराठीत  सांगायचे झाले तर हार्ड  कॉपी  नसली तरी सॉफ्ट कॉपी मात्रअजूनही रेकॉर्ड  वर आहे, इतक्या दशकांनंतरही डीलीट  न होता राहिली  आहे . इंदुताई माझ्या आईची  भाची  तिच्या मावसबहिणीची आवडूताईंची मुलगी ,आणि तिच्या मावसभावाची  गुरुदास भाऊंची बायको , आणि समवयस्क असल्याने जिवाभावाची मैत्रीण .माझ्या आईची आणि इंदुताईची  मैत्री अतूट होती,आपली मैत्रीण आणि नणंद ह्या दोनीही नात्याने  दोघीही एकमेकींच्या भावबंधनात त्या गुंतल्य...

अरविंदमामा

   कैलासवासी ,दिवंगत , असे शब्द काही व्यक्तीचा  उल्लेख करताना आपण  वापरूच शकत नाही  कारण त्यांनी तुमच्या मनाच्या आलबम मध्ये त्यांचा जिवंत फोटोच चिकटवलेला असतो ,त्या फोटोला मनातल्या मनात का होईना  हार घालण्याची  हिंमतहि होत नाही कारण हार  फक्त  मृत व्यक्तींच्या फोटोला घालतात आणि काही माणसे तुमच्या साठी कायमचीच जिवंत असतात , अरविंदमा मा  हे असेच एक जिवंत व्यक्तिमत्व .  अरविंदमामा माझ्या आईचा भाऊ ",सक्खा की  मावस कि चुलत हे शब्द फेणे बोरकर कुटुंबात कधीच वापरातच नसतआणि  ,कारण ते मनातही येत नसत भाऊ अथवा बहीण , मोठा कि लहान हाच फरक असायचा , तो फरक शब्दातच   दृग्गोचर व्हायचा .  आपला हा समवयस्क भाऊ आईला फार जवळचा वाटायचा ,काहीकाळ मुंबापुरीत राहून हा भाऊ तिच्या जवळ"मुंबैक घरार घरे आसात"म्हणून सांगायचं तेव्हा त्याचा थोडासा हेवाही वाटायचा ,तिच्या मनातली त्याची लहानपणातली प्रतिमा तिने कायमची जपून ठेवली होती ,आणि त्या आठवणींच्या रमलखुणा वारंवार तिच्या शब्दातून उमटायच्या . हा आता सांगितलं तो आईचा भाऊ ,पण माझा अरविंद मामा ...