पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेदनांचा कॅलिडोस्कोप

इमेज
             वेदनांचा कॅलिडोस्कोप  रवींद्र शोभणे ह्यांचा "ओल्या पापाचे फुत्कार "हा कथा संग्रह हा कथा संग्रह नुकताच वाचनात आला आणि डोळ्यासमोर  आला ,सहाच्या सहा कथांचे  वेदनामय तरंग इतके बहू आयामीआहेत कि त्यांच्या कल्लोळात वेदनेच्या छटा कॅलिडोस्कोप    सारख्या भासतात , साध्या काच तुकड्यांच्या सावल्यांचा  आरस्पानी खेळ पण एक दुसऱ्याशी वेगळे पण दाखवणारा ,अगदी शोभण्याच्या कथांतून दृग्गोचर होणाऱ्या  वेदनेसारखे . ओल्या पापाचे फुत्कार  ह्या पाहिल्याकथेत तर लेखकाने  शिक्षण क्षेत्रातल्या चाचेगिरीचे क्यालीडोस्कोपिक दर्शन घडवले आहे ,त्या क्षेत्रातली लबाडी अरेरावी आणि सत्ता आणि पैश्याच्या जोरावर सर्व काही विकाऊ आहे असे स समजणाऱ्या  धन दांडग्या तक्षकाचे विखारी फुत्कार आणि त्या फुत्काराच्या विषाने कोळपणारे गिरीश आणि चित्राचे भावजीवन  लेखकाने  ताकदीने  चितारले  आहे , कथा महाभारतातलीच फक्त आजच्या संदर्भात प्रगटणारी ,"पुरुषो अर्थस्य दासः हे कटू सत्य सांगणारी कथा ,ह्या कथेत  समाज जीवनावर उ...

एक अमरवेल

इमेज
संस्कृत मध्ये मुलीला एक सुंदर शब्द आहे "दुहिता" आणि अर्थ आहे जी दोनीही घरांचे  म्हणजे  सासरच्या आणि माहेरच्या हितांचे रक्षण करते ती  ,तारेवरची कसरत असते कधी तोल चुकेल ते सांगता येत नाही. हि तारेवरची कसरत  माझ्या मावशीने विमलताईने   पार पडली . विमलताई हि माझी मावशी ,सावा काची  मुलगी माझ्या आईची मावस बहीण ,ती  शिवाजी पार्कला आमच्या शेजारी राहायची. मी माझ्या लहानपणी माझ्या आजोळी राहायचो ,विमलताई ,शंकर भावोजी ,कुमारदादा,आणि जयश्री ताई ,असे चौकोनी कुटुंब , कुटुंब चौकोनी असले तरी कुटुंबाच्या कक्षा फार मोठ्या होत्या ,सगळ्यांना सामावून घेणारे कुटुंब म्हणुन  मान्यताप्राप्त होते . शंकर भावोजी कस्टम  मध्ये उच्च  हुद्द्यावर होते , एक स्वच्छ  हुशार आणि निर्भीड अधिकारी  अशी  त्यांची ख्याती होती ,त्यांच्या ह्या  स्वभाव गुणाचे त्यांना तोटे सोसावे  लागले पण त्यांची प्रतिमा मात्र निष्कलंक राहिली. मला वाटते त्यांच्या ह्या  संचिताचे फळ म्हणजे  त्यांच्या चेहऱ्यावर  कायमचे झळाळणारे तेज आणि सामाजिक...