वेदनांचा कॅलिडोस्कोप
रवींद्र शोभणे ह्यांचा "ओल्या पापाचे फुत्कार "हा कथा संग्रह हा कथा संग्रह नुकताच वाचनात आला आणि डोळ्यासमोर आला ,सहाच्या सहा कथांचे वेदनामय तरंग इतके बहू आयामीआहेत कि त्यांच्या कल्लोळात वेदनेच्या छटा कॅलिडोस्कोप सारख्या भासतात , साध्या काच तुकड्यांच्या सावल्यांचा आरस्पानी खेळ पण एक दुसऱ्याशी वेगळे पण दाखवणारा ,अगदी शोभण्याच्या कथांतून दृग्गोचर होणाऱ्या वेदनेसारखे .
ओल्या पापाचे फुत्कार ह्या पाहिल्याकथेत तर लेखकाने शिक्षण क्षेत्रातल्या चाचेगिरीचे क्यालीडोस्कोपिक दर्शन घडवले आहे ,त्या क्षेत्रातली लबाडी अरेरावी आणि सत्ता आणि पैश्याच्या जोरावर सर्व काही विकाऊ आहे असे स समजणाऱ्या धन दांडग्या तक्षकाचे विखारी फुत्कार आणि त्या फुत्काराच्या विषाने कोळपणारे गिरीश आणि चित्राचे भावजीवन लेखकाने ताकदीने चितारले आहे , कथा महाभारतातलीच फक्त आजच्या संदर्भात प्रगटणारी ,"पुरुषो अर्थस्य दासः हे कटू सत्य सांगणारी कथा ,ह्या कथेत समाज जीवनावर उमटणाऱ्या बलात्कारी व्रणांचे ठसठशीत अभद्र दर्शन घडते ,अनेक शैक्षणिक संस्थांच्या साधनशुचितेचे बुरखे टराटर फाडणाऱ्या आणि तथाकथित ज्ञानमहर्षींच्या पंचांना फेडणारी हि कथा राजकारण आणि अर्थकारण ह्यांच्या व्यभिचारी युतीचे समर्पक दर्शन घडवते .
दुसऱ्या कथेचे नाव आहे द्वंद्व शिक्षण संस्थातल्या राजकारण आणि अर्भकारणाचा आणि एक किळसवाण्या व्यभिचाराचे एक आगळेवेगळे चित्रांकन., ह्या क्षेत्रातल्या बुद्धिबळाच्या खेळाचे बारकावे सांगत जाते ,भुसभुशीत आणि कचखाऊ माणसे आणि संस्था समाजाला काहीही देऊ शकत नाहीत आणि फक्त वैफल्यच देते असे सांगणारी हि कथा सगळ्याच प्रेषितांचे पाय मातीचेच असतात ,असाही एक संदेश देऊन जाते शिक्षण क्षेत्रातल्या राजकारणाचे अभद्रदर्शन ह्या कथेतून घडते राजकारणाचे तिसरे पाउल आपल्या समाजातल्या सगळ्याच क्षेत्रांना रसातळाला पाठवते आहे ह्याचा एक जिवंत पुरावा हि कथा देते . बचेंगे तो औरभी लढेंगे मानणाऱ्या दत्ताजींचे लोभस दर्शन प्राध्यापक कलाकारांचा अर्ज शब्दांकित करतो .
मराठी सामाजिक जाणिवांना ढवळून काढणाऱ्या कथालेखिकेत एक अविस्मरणीय नाव विभावरी शिरूर हिंदोळ्यावर ",ह्या त्यांच्या कादंबरीने एक काळी तत्कालीन कुमारिकांचा प्रश्न ऐरणीवर आणला होता ,विभावरी शिरूर ह्या टोपण नावाने लिहीणारी लेखिका ह्या स्त्रीवादी लेखिकेचे खरे नाव बाळू ताई खरे रणांगण विश्राम बेडेकरांची पत्नी. हिंदोळयावर बसलेल्या विभवारीचे प्रश्न अजूनही तेच आहेत , त्या" प्रश्नांना तिची कहाणी" मध्ये शोभण्यानी माधुरीच्या दुःखाला अगतिकतेच्या अंतिम पायरीवर बसवले आहे .साधनाताई ,मंदाबाई आणि शशांक ह्यांच्या व्यक्तिरेखा एवढ्या जिवंत आणि ठसठशीत वाटतात कि त्या नसत्या तर तिची कहाणी रंगलीच नसती कोणाकोणाच्या हट्टी पणाचा,कोत्या वृत्तीचा मोठा फटका माधुरीचा उंच झोका धाडकन वास्तवाच्या खडकाळ जमनीवर रक्तबंबाळ करून उतरवतो ,हरवलेल्या आवाजाचा वांझोटा शोध वृद्धाश्रमाच्या आश्वासकते कडे पोहचवतो ,ढासळत्या कुटुंबव्यवस्थेचा शाप ह्या कथेने अधिरेखित केला आहे .
सहा कथेतल्या तीन कथांचा हा घेतलेला धांडोळा ,ह्या कथा मानवी जीवनातली दुःखाची व्याप्ती आणि आणि विविध छटा अतिशय जिवंतपणे दर्शावतात . जगतगुरु शंकराचायांची एक गोष्ट आठवते ,मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादात त्यांना सरस्वतीने मंडनमिश्राच्या पत्नीने काही प्रश्न विचारले ज्याची उत्तरे देण्यासाठी त्यांना गृहस्थाश्रमी माणसाच्या मृत कायेत परकाया प्रवेश करावा लागला होता ,रविन्द्र शोभण्याच्या कथा इतक्या जिवंत आणि स्वानुभवी वाटतात कि हा त्यांचा परकाया प्रवेशच भासतो .
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२