ज्या घरी हरी चा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे,
ज्या घरी हरी चा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे मी लहानपणी माझ्या आजोळी शिवाजी पार्क दादर येथे रहात होतो ,माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर उर्फ दादांची शाळा ,आणि मी रहात होतो त्या घराचे नाव नाव कैवल्यधाम. माझे आजोबा आईच्या मावशीचे यजमान श्री दुर्गराव कृष्णराव बोरकर हे त्याघराचे कुटुंबप्रमुख होते ,त्यांना मी काका आजोबा ह्या नावाने संबोधत होतो , मला ते नान्या ह्या नावाने हाक मारत.त्यांच्या कडून एकलेल्या दोन ओळी मला अजूनही आठवतात ज्या घरी हरी चा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे, काका आ जोबांचे ते शब्द तअक्षय आणि अमर ठरले , कारण मनीषा सारख्या एका कन्यारत्नाचा तिथे जन्म झाला . माझ्या वसंत मामा आणि मामी मंदाकिनी ह्यांचे ते एकुलते एक अपत्य वडिलांची हुशारी आणि आईची व्यवहारचातुर्य हे वारश्याने आलेले गुण आणि आजोबांच्या पुण्याइने मिळालेली कुठल्याही प्रसंगाला यशस्वी पणे सामोरी जाणारी एक प्रथम ...