ज्या घरी हरी चा कर आहे त्या घरी हरी चाकर आहे,

  ज्या घरी हरी चा  कर आहे त्या घरी  हरी चाकर आहे

मी  लहानपणी माझ्या आजोळी शिवाजी पार्क दादर येथे   रहात होतो ,माझी शाळा बालमोहन विद्यामंदिर उर्फ दादांची शाळा ,आणि मी रहात होतो त्या घराचे नाव नाव  कैवल्यधाम. माझे  आजोबा  आईच्या मावशीचे यजमान श्री दुर्गराव कृष्णराव बोरकर हे त्याघराचे  कुटुंबप्रमुख होते ,त्यांना मी काका आजोबा ह्या नावाने  संबोधत होतो ,  मला ते नान्या  ह्या नावाने हाक मारत.त्यांच्या कडून एकलेल्या दोन ओळी मला अजूनही आठवतात 

  ज्या घरी  हरी चा कर आहे त्या घरी  हरी चाकर आहे,

काका आजोबांचे ते   शब्द  तअक्षय आणि अमर ठरले , कारण  मनीषा  सारख्या  एका कन्यारत्नाचा  तिथे जन्म झाला .   माझ्या वसंत मामा   आणि  मामी मंदाकिनी ह्यांचे  ते एकुलते एक अपत्य वडिलांची हुशारी आणि आईची व्यवहारचातुर्य  हे वारश्याने आलेले गुण आणि आजोबांच्या पुण्याइने  मिळालेली कुठल्याही प्रसंगाला यशस्वी पणे सामोरी जाणारी एक  प्रथम पुरुषी एक वचनी  वृत्ती ,ह्याच्या जोरावर मनिषा  अनेक माणसांशी आणि प्रवृत्तींशी लढली झगडली , आणि  आयुष्यात यशस्वी झाली ,काकाजोबानी  सांगितलेला  हरी चा  कर तो हा 'कळत नकळत सदैव पाठीशी उभा  राहिला ,पूर्व संचित म्हणतात ते असे          

दुःखात तू सदैव आठवतोस म्हणून    कुंतीने  कृष्णाकडे दुःख  मागितले होते 'न  मागतही  मनिषाच्या पदरात अनेक  शारीरिक आणि मानसिक दुःखे  पडली    'आई वडिलांचाचा  अकाली मृत्यू ,,फसलेले वैवाहिक नाते आणि त्यातून भोगावा लागलेला  अमानुष छळ ,भागीदारीत सहन करावे लागलेले हेवे दावे ह्या सर्वांना यशस्वीपणे तोंड देत ही रणरागीणी लढली आणि विजयी झाली , मानसिक किंवा शारीरिक व्याधी  कधी तिला  वाकवू  शकले नाही ,आयुष्यात भोगाव्या लागलेल्याअनेक  कळा  तिने  कळ्या म्हणून स्वीकारल्या  आणि आज त्यांची फुले झाली आहेत . एक सुगंधी  ब्रम्हकमळ  सदैव  हसरे आणि सुवासिक'   दुःखाचे डोंगर कोसळे म्हणून कधीही कोमेजले नाही . ज्या वयात पाठीवर फिरणाऱ्या हातांची जरूर असते ,त्या वेळीच प्राक्तनाने हे हातच तिच्या कडून हिरावून घेतले होते .     कोणाच्याही सहानुभूतीची तिने अपेक्षाही केली नाही आणि कुठल्याही नात्याची उपेक्षा हि केली नाही ,आपला प्रथमपुरुषी एकवचनी बाणा मात्र कायमचा जोपासला .                      

  आपण आपले नायक  आणि नायिका फक्त इतिहास आणि कथा कादंबऱ्यात शोधतो वर्तमानातली हि उत्तुंग  व्यक्तिमत्व आमच्या लक्षातही येत नाहीत ह्यांची उंची मोजण्याची पट्टी कदाचित आपल्याकडे उपलब्ध नसावी   मनीषा हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे ,अनेक क्षेत्रात तिला गती आहे ,आणि त्याचा वाणिज्य वृत्तीतून उपयोग कसा करावा ह्याची उप जत जाण  ही  आहे

 नेणारे दैव असते आणि देणारा परमेश्वर  ,आणि तो फारच दयाळू आहे आपल्यावर नितांत श्रद्धा ठेवण्याऱ्यावर तो अनंत हाताने सुखाची उधळण करतो ,रवी सारखा जीवन साथी आणि ऋता सारखी मुलगी देऊन तुझे दान पावले म्हणून देवांनी पावती ही  दिली ,व्याजावर व्याज म्हणून नातूही दिला , काही जणांच्या देवावरच्या श्रद्धेचे आणि  आणि कर्मयोगा वरचे फळ उशिरा मिळते पण ते सशक्त आणि निरंतर साथ देणारे असते ,आपल्या देवावरचीआणि कर्मयोगावरची  श्रद्धा ह्याचे हे सुकृतफल तिची साथ निरंतर देवो हि ईश चरणी प्रार्थना करून ह्या मंगला चरणाची सांगता कुसुमाग्रजांच्या कोलंबसाचे गर्वगीत ह्या कवितेतल्या दोन ओळीने सांगता करतो 

अनंत आमुची ध्येयासक्ती अन अनंत अमुच्या आशा  किनारा तुला पामराला 

शशांक 





या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे

इंदुताई आणी गुरुदास मामा