चेड्याचे फेणे

-चेंडयाचे फेणे

तोडूर ,बिणगे ,चेंडये ,अर्गे ,अवरसे ,हि कारवारच्या जवळची संपन्न खेडी
,भरपूर भात  शेती ,नारळी  फोफळी,आंबे ,फणस ,काजू ,कोकम आणि वटंबाची
,झाडे  यांनी हा प्रदेश झाकलेला होता ,त्याकाळातल्या संपन्नतेची  जी
मोजमापे होती ती ओसंडून वाहणारी संपन्नता शेणैच्या घरात वाहायची ,शणै
प्रदेशाचा राजा ,मुल्क खुदाका ,खुलक कंपनीका आणि अंमल  शेणैका  अशी अवस्था
होती ,घराण्यात  शानभोगी  किंवा मामलतदारी  अथवा  सरकारी पदवी असली तर
घराण्याचा मोठेपणा निर्विवाद असायचा ,त्यांचा उल्लेख  "मोठ्ठ घराणे ते
"म्हणून केला जायचा ,अशी अनेक घराणी  ह्या परिसरात होती ,पुरुष शेती गाव
आणि गावाचे राजकारण ह्यात मग्न असायचे आणि  स्त्रीया आंगण ,परसू
,नोकरचाकर ,अंगावरचे मण भराचे दागिने , वार्षिक सणवार ,आणि बाळंतपणे
ह्यात मग्न असायच्या  हि अशी परिस्तिथी   होती .


काळ बदलत होता ",उत्तम शेती ,माध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "ह्या
म्हणीचा क्रमवार  पूर्ण बदलला ,नोकरीचे महत्व वाढले ,इंग्रजी शिक्षणाने
सामाजिक गरजा  आणि  जाणिवांचा चेहरा मोहरच बदलला ,अनेक तरुण नोकरी साठी
आपली गावे सोडून शहराकडे जायला लागले ,धोतर पगडी ते शर्ट प्यांट हे बदल
झपाट्याने आले ,हा बदल फारच थोड्या वेळात झाला आणि ह्या बदलाचे पडसाद उच्चवर्णियात
 जोरात उमटायला लागले ,चेंडेहि त्याला अपवाद नव्हते
तिथेही हीच पडझड चालू होती ,हे बदल उच्चवर्णीयांत तर हत्तीच्या पावलाने
आले आणि हत्तीच्या पावलानेच ह्या छोट्या छोट्या खेड्यातले उच्चवर्णीय
समाजजीवन  उध्वस्त करून गेले ,खेडी हळू हळू पोरकी होत गेली आणि कुळ
कायद्याने तर  आमच्या समाजाला पूर्णपणे हद्दपार केले ,ब्रिटिश  राजवटीला
पाहिजे असलेल्या चाकरमान्यांचीच गरज उच्चवर्णीयांकडून पुरी होऊ लागली ,एक
तरुण नरहर फेणे चेंढ्याहून मुंबईला व्हाया  कारवार  गेला ,ह्या प्रवासात
त्याची   सोबत केली सावित्रीने  त्या प्रवासाची हि कहाणी  आणि  ती
कहाणी  आता पोहचली आहे  रूपा उज्ज्वला, दौलत ,सदाशिव   आणि अनेक ज्ञात
आणि आज्ञात  फेणे  कुलोत्पनां पर्यंत ,.

नवनवोन्मेषशालिनी बुद्धी, धाडसी  वृत्ती ,आणि प्रचंड  मेहनत करण्याची
हिम्मत, नियतीने च  फेण्यांच्या  पदरात दान म्हणून नव्हे तर वहिवाटी हक्क
म्हणून दिली असावी. आयुष्यात फक्त पुढच्याच टप्पे गाठायचे हि त्या
कुटुंबाची परंपरा  आणी ,आजही ती चालू आहे ,


या कुटुंबात दिसणारी  ईश्वरदत्त गुणवत्ता हि परंपरागत  आहे अजूनही तशीच
लखलकीत आणि  चिरंजीवी  आहे  ज्याज्या क्षेत्राला ह्यांचा  स्पर्श लाभला
त्यात्या क्षेत्राचे ह्यांनी सोने केले ,

नरहर फेणे एक आगळे वेगळेच  व्यक्तिमत्व   होते येणाऱ्या काळाची पावले
ओळखण्याची  कुवत त्यांच्यात  होती ,शिक्षण घेतल्यावर इतरेजनांनाही शिक्षित करण्याचे
शिवधनुष्याचा भर उचलणे सोपे नव्हते आणि त्याची जरूरीही नव्हती पुरेशी
शेती जमीन जुमला होता  पण सर्वसामान्यांसारखे वागले तर ते फेणे कसले,
"किनारा तुला पामराला  "म्हणून  सागरालाही धमकावणाऱ्या कोलाम्बसीवृत्तीचे
कवचकुंडले  घालूनच फेणे वावरत होते आणि आजही तसेच वावरतात.



त्यांनी
शिक्षकी क्षेत्रात पदार्पण केले अंकोल्याला  किंग  एडवर्ड हायस्कुल मध्ये
 हेड मास्तरम्हणून  त्यांची नियुक्ती झाली ,  शाळाही नामांकित शाळा होती
ऋग्वेदी वामन मंगेश
दुभाष्यानीस्थापन  केलेली ,पण नियतीची चाल काही वेगळीच होती घरही मोठा
मुलगा म्हणून शाळा सोडून  त्यांना इस्टेट आणि शेती बघायला चेंढ्याला
परतावे लागले ,पण मन आणि कर्तृत्व चेन्ड्याच्या घरवावरात रमणारे नव्हते
पुनश्च्या हरी ओम म्हणत गरुड झेप मुंबई कडे झेपावली  आणि एका मोठ्या
कंपनीत नोकरीला लागले .हि मधली घंटा होती  सर्व  काही आलबेल होते
,सावित्रीची साथ होती   संसार आणि पगार दोनीही हातात हात धरूनच वाढत होते
,काही कामास्तव मुंबईहून  दिल्लीला बदली झाली ,आणि त्यानंतर जगातूनच कायमची बदली
झाली ,कर्तृत्वाच्या माध्यन्य  काळीच बायको मुलं आणि आईला सोडन  भिंतीवरच्या
फोटोत  जाऊन बसावे लागले ,धाकटा अरविंद फक्त एक वर्षाचा होता , अंक पहिला
आणि त्याची वाजणारी भेसूर घंटा सावित्रीच्या कानात घणाणली ,सधावा ते
विधवा हा प्रवास त्याकाळी फारच दुःखद होता ,भर पावसात घराचे छप्पर
उडल्यागत व्हायचे .पण आंधळ्यांची गुरे श्रीहरी राखी हा अनुभव
सावित्रीलाही आला तिची धाकटी
बहीण आपका आणि तिचे मेहुणे  राममास्तर (माझे आजी आजोबा)ह्यांनी तिला
सन्मानाने कारवारला आपल्या घरात बोलावले ,मुंबई हुन कारवारला सर्व मंडळी
आली मुले लहानच होती ,आणि हिचे वैधव्याही ताजेच ,कारवारला बहिणीच्या घरी
आली पण त्या काळा च्या प्रथेनुसार खोलीत ठेवलेल्या कॉटवर न बसता जमनीवर  बसली ,बहीण
खरी म्हणता लहान होती पण मोठ्या बहिणीच्या दुःखाने तिला आई बनवले आणि
मेहुण्याला  वडील ,मोठ्या सन्मानाने आणि निर्धाराने त्यांनी  तिला कॉट  वर बसवले
,प्रगत विचाराने अनिष्ठ प्रथांवर विजय मिळवला ,उजाडलेले  एक छप्पर पुन्हा
शाकारलें  गेले ,गंगा यमुने सारख्या बहिणी बहिणी एकमेकात विसावल्या
,बोरकर आणि फेणे ह्यांच्यात आडनाव सोडून कसलेही अंतर राहिले नाही ,अगदी
अनंताची पूजा सुद्धा  सनई चौघड्यांबरोबर मास्तरवाड्यात साजरी होऊ लागली.

शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२

Email ID :- shashank.ranganekar@gmai.com.






या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

इंदुताई आणी गुरुदास मामा