-चेंडयाचे फेणे तोडूर ,बिणगे ,चेंडये ,अर्गे ,अवरसे ,हि कारवारच्या जवळची संपन्न खेडी ,भरपूर भात शेती ,नारळी फोफळी,आंबे ,फणस ,काजू ,कोकम आणि वटंबाची ,झाडे यांनी हा प्रदेश झाकलेला होता ,त्याकाळातल्या संपन्नतेची जी मोजमापे होती ती ओसंडून वाहणारी संपन्नता शेणैच्या घरात वाहायची ,शणै प्रदेशाचा राजा ,मुल्क खुदाका ,खुलक कंपनीका आणि अंमल शेणैका अशी अवस्था होती ,घराण्यात शानभोगी किंवा मामलतदारी अथवा सरकारी पदवी असली तर घराण्याचा मोठेपणा निर्विवाद असायचा ,त्यांचा उल्लेख "मोठ्ठ घराणे ते "म्हणून केला जायचा ,अशी अनेक घराणी ह्या परिसरात होती ,पुरुष शेती गाव आणि गावाचे राजकारण ह्यात मग्न असायचे आणि स्त्रीया आंगण ,परसू ,नोकरचाकर ,अंगावरचे मण भराचे दागिने , वार्षिक सणवार ,आणि बाळंतपणे ह्यात मग्न असायच्या हि अशी परिस्तिथी होती . काळ बदलत होता ",उत्तम शेती ,माध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी "ह्या म्हणीचा क्रमवार पूर्ण बदलला ,नोकरीचे महत्व वाढले ,इंग्रजी शिक्षणाने सामाजिक गरजा आणि...