कैवल्यधाम

माझा जन्म दादर शिवाजीपार्क येथील दिवेकर हॉस्पिटल मध्ये झाला. 

 माझे बालपण माझ्या आजोळी गेले ,शिवाजी पार्क येथील तेव्हाच्या

 शिवाजी पार्क रोड नंबर ३ येथे कैवल्यधाम नावाची एक सुरेख बिल्डिंग होती , ह्या बिल्डिंगचे मालक होते  बोनगाळे  कुटुंब प्रमुख काका बंगले ह्या नावाने ओळखले जात ,हि इमारत दोन मजली होती ,ह्या दोन मजली इमारतीत सर्वात वरच्या दुसऱ्या मजल्या वर मालक राहायचे ,पहिल्या मजल्यावर गुब्बी आणि शिवतरकार आणि तळ मजल्यावर आम्ही बोरकर आणि पालेकर अशी पाच कुटुंबे राहायची ,हि सुशीक्षीत आणि सुस्थित कुटुंबे तत्कालीन मध्यम वर्गीय समाजाचे प्रतिनिधित्व करत होती . आमची शाळा बालमोहन विद्यामंदिर उर्फ दादा मास्तरांची शाळा केवळ पाच पावलांवर आहे , ह्या शिवाजीपार्क परिसरातली बहुतेक कुटुंबे दादांशी एक भावनिक जवळीक साधून होती ,दादांच्या शाळेत मूळ गेले कि आई वडिलांची अर्धी जवाबदारी गेली असं लोकांना वाटायचे आणि ते खरंच होते आमच्या कैवल्यधाम मधली बहुतेक मुले ह्याच शाळेत शिकली आणि मोठी झाली माझा मामा वसंत मामा, कुमारदादा ,जयश्रीताई ,शैलामावशी ज्योत्स्ना मावशी आणि मी आणि मला वाटते शशी दादा हि बालमोहनचे विद्यार्थी होते ,कैवल्यधाम ,बालमोहन ,आणि आमची गल्ली ह्याचे एक अतूट नाते होते . मी आजोळी बोरकरांकडे राहायचो तेव्हा त्या घरात माझे आजोबा ,आजी ,माझ्या आईच्या मावशीचे यजमान दुर्गाराव बोरकर ज्यांना मी काकाआजोबा म्हणायचो ,माझे दोन मामा भाऊमामा ,आणि वसंतमामा, आणि दोन मावश्या शैला मावशी आणि ज्योत्स्ना मावशी इतकी माणसे राहायचो ,आणि आमचे सक्खे शेजारी होते पालेकर कुटुंब ,माझ्या आईची मावस बहीण विमल पालेकर मावशी आणि भाची दोघीही कारवारच्या घरात एकत्र राहिल्या होत्या आणि नशिबाने मुंबईतही त्यांना शेजारी शेजारी आणले होते आणि ते आणले होते कैवल्यधाम मध्ये विमलताईंचे आणि आपकाचे एक साधर्म्य मला नेहमी आढळते कि दोघीही सश्रद्ध होत्या पण अंधश्रद्ध नव्हत्या ,आणि प्रगत विचाराच्या होत्या पण तत्कालीन रूढी आणि परंपरांना ना दुखावता मार्ग काढणारी होत्या ,आमच्या दोन घरामध्ये एक दरवाजा होता ,तो दरवाजा शंकर भावजी ऑफिसला गेले कि उघडायचा आणि ऑफिसमधून आले कि बंद व्हायायचा ,आजकाल privacy च्या नावावर जी माणसे दुरवताहेत आणि तू मी आणि आपण ह्या शब्दात अंतर वाढतंय ते ना वाढवता स्वतःची अस्मिता खर्ची न घालता माणसा माणसातले अंतर कसे कमी करायचे व्यवस्थापन दोघीनाही अवगत होते ,आज जर दोघीही हयात असत्या तर आजच्यासारखे reunion सारखे कार्यक्रम वेगळे करावे लागले नसते पण काळाहून कोणीही ताकतवान नसते ,म्हणून म्हणता कालाय तस्मै नमः ,पण नाती अतूट असतात ,आपलेपणाचा दोर तोडावा म्हंटलंतरी तुटत नाही ,म्हणूनच श्रीहर्ष ,शशांक ,शैलेश रूप दौलत ,रणजित ,जयश्री ताई ,विनोद दादा ,हि वेगवेगळ्या वयाची प्रकृतीची आणि विचारांची माणसे एकत्र येतात काळाला हरवतात आणि ठासून सांगतात कि आमी एकमेकांचे नातेवाईक आहोत ,आणि ती नाती जोडायची कशी हे आम्हाला माहिती आहे , reunion व्हायला union मुळात असावे लागते आणि ते अजूनही शाबूत आहे आमच्या मागच्या पिढीने ते घट्ट रोवले आहे आणि आमचीहि टाकत तीच आहे . कैवल्यधाम मधल्या आठवणींचा कॅलिडोस्कोप इतका देखणा आणि मनमोहक आहे नेहमीच आठवावासा वाटतो ,प्रत्येक चित्रकृती आगळी आणि वेगळी . शैला मावशी,ज्योत्स्ना मावशी आणि जयश्री ताईची मैत्री ,कुमारदादाची वैद्यकीय हुशारी ,शंकरभावजींची पुडुचेरीला झालेली बढती , अनेक घटनांचा धावता आलेख नकळत डोळ्या समोर येतो , विमलताईंचे ते सुंदर आटोपशीर आणि सुबक घर त्यातला तो मारून रंगाचा सोफा सेट एक उंच लाकडी फ्लॉवर पॉट ,अजूनही तेवढाच टवटवीत असल्याचा आठवतो ,त्या फ्लॉवर पॉट ने कित्येक समारंभांना साथ दिली होती,कित्येक डोहाळे जेवणाचा ,मुलगी दाखवण्याच्या कार्यक्रमाचा तो मूक साक्षीदार होता आज एकदा नाही सांगता येणार, विमलताईंचे वर्णन मी अमरवेल म्हणून केले आहे खरोखर सार्थच आहे ते , त्या घरात सर्व फेणे कुटुंबीयांची सारखी वर्दळ असायची ,सगळ्यात मोठे भाऊ रायमामा दार शनिवारी यायचे विमलताइताली भोज्येषु माता जागृत व्हायची ,बाळाभाऊ आमच्या जवळच राहायचे ,त्यांचा दिवंगत पुत्र बाबू हा तिचा फार लाडका होता ,तो गेल्याचे कळल्यावर हादरलेली विमलताई अजूनही डोळ्यासमोर येते ,दोन बोटांच्या बेचक्यात सिगारेट धरणारे दिनूभाऊ,उषाताईंच्या साखपुड्याला बटाट्याच्या हलव्याची सुंदर हस्ताकृती करणारे रामदास भाऊ ,मराठीत बोलणारी एकुलती एक मामी श्रीहर्षची आई ,शशी दादा ,लहानपणी भात भात म्हणून आवडीने खाणारी आणि आसाम हुन आपल्या आजोळी येणारी रूपा ,अजूनही ती बोलकी चित्रे डोळ्यासमोर येतात ,उषाताई आणि सावका ,आणि बिपिनच्या समोर गजराचे घड्याळ धरणारा कुमारदादा ,तुला एरंडेलाची बिर्याणी कायाला देणार आहे म्हणून मस्करी करणारी स्मिता वहिनी ,सगळ्याच्या आठवणींचा हा कॅलिडोस्कोप अजूनही मनाला लोभावतो ,माझ्या आठवणीतले कैवल्यधाम त्याची हि छोटीशी झलक ' चित्रे पुसता येतात लिहिलेले खोडता येते पण आठवणी त्या मात्र कायमचाच राहतात , आजही आठवते कि शिवाजी पार्क मध्ये आमच्या गल्लीत गॅस चे दिवे होते काळोख झाला कि एक उंच काठी घेतलेला माणूस एकेक दिवा पेटवत जायचा काळोख आणि डोळ्यातही जायचा उजेड पडायचा तो प्रकाश आजही पडतो आहे मनात आणि डोळ्यातही. शशांक -- -- 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे

इंदुताई आणी गुरुदास मामा