शैला मावशी एक अपराजिता

          शैला मावशी एक अपराजिता

माझ्या आजीची अपाकाची धाकटी बहीण अंबा मावशीचा सत्तेचाळीस साली अचानक टायफईडने मृत्यू झाला. नवरा ,एक मुलगा आणि दोन मुलींना सोडून अंबामावशीला भरल्या ताटावरून उठून जावे लागले होते.   टायफईडला  त्या काळी  पर्यायी शब्द फक्त मृत्यूच होता ,अनेक  घराच्या चुली ह्या रोगाने थंडावल्या होत्या. शिवाजी पार्कच्या एम .बी  राउत रोडवर  बरीच स्वयंपाकघरे थंडावली होती.
"माय  मरो  पण मावशी जगो  "हि मराठी  भाषेतली एक कमनशिबी  म्हण ,
कमनशिबी अश्यासाठी म्हणायची कि हीच खरा अर्थ कुणाला कळलाच  नाही ,आईला मर आणि मावशीला शतायुषी भव असे हि म्हण  सांगत नाही ,तर ती सांगते की  आईच्या प्रेमाइतकच किंबहुना काकणभर अधिकच मावशीचे  प्रेम सरस  असते ,कारण त्या प्रेमात बहीण आणि तिचे अपत्य  ह्या दुप्पट मायेची साय असते ,अंबामावशीच्या मुलांची काळजी  घ्यायला  तिची मोठी बहीण माझी आजी  अपाका  धावून आली.
अपाकाचे नाव  लग्नात  बदलले आणि दुर्गा ठेवले ,किती समर्पक नाव होते ते ,अगदी देवीच्या  आरतीच्या पहिल्या ओळीची आठवण करून देणारे , बहीण मोठी असो कि लहान कुणाच्याही संसाराचा गोवर्धन उचलायला हिचीच करंगळी तत्पर असायची . अपाका आली आणि तिने संसाराचा भार आपल्या खांद्यांवर घेतला ,

शैला मावशी हि माझी मावशी ,माझ्या आईची धाकटी बहीण ,सक्खी कि मावस हा प्रश्न लोकांना पडत असे ,पण मला माझ्या आईला  आणि दोनीही मावश्याना हा प्रश्न कधी पडलाच नाही ,सक्खा ,मावस ,चुलत आमच्यालेखी व्याकरणातले शब्द आहेत ,आमच्या लेखी त्या शब्दांना कवडीचीही किंमत नाही ,माझ्या दोनीही मावश्यांची , आणि मामांची मुले आणि सुना  ह्यांच्या लेखी आम्ही त्यांचे सक्खे आहोत आणि ह्या नात्यानेच एक संयुक्त कुटुंब म्हणून आम्हाला एकत्र ठेवले आहे ,आमच्यात मतभेद आहेत पण म न भेद कधीही उद्भवत नाहीत आणि उध्दभवणारही नाहीत.

माझे बालपण शिवाजी पार्कला आजोळी गेले ,घरात आजी आजोबा ,काका आजोबा ,अंबा मावशीचे  यजमान ,वसंत मामा ,भाऊमामा ,हे माझे दोन मामा ,शैला मावशी ,ज्योत्स्ना मावशी ,ह्या दोन मावश्या आणि मी  अशी आठ माणसे राहत होतो एक सर्वसाधारण कारवारी मराठी घर ,सुख आणि समाधान ह्या शब्दांच्या तथाकथित  व्याख्या आणि अर्थ माहित नसल्यानी आम्ही खरोखर सुखी होतो ,सुखाचा शोध घ्यायची  कधी  जरूर भासली नाही तर दुख्खाची मुळे  शोधावीशीही वाटले नाही ,सुख आणि  दुक्ख  दोन्हीही अगदी हातात हात घालून चालत होती ,सुखाची व्याप्ती मोठी नव्हती आणि दुःखाची बोचही फारशी काटेरी नव्हती.

शैला मावशी माझ्यापेक्षा  दहावर्षांनी मोठी तिचे लहानपण मला फारसे आठवत नाही ,आठवते ती निर्मला निकेतन ह्या कॉलेज मध्ये जायचे ते दिवस ,कारण एकाच होते कि दर बुधवारी तिथे एक नवीन पदार्थाचे प्रात्यक्षिक  व्हायचे  आणि थोडासा प्रसाद  यायचा मी आणि ज्योत्स्ना मावशी त्यासाठीच तिची वाट बघत बसायचो. 

तिचे लग्न  साली शानभाग कुटुंबात श्री दत्ताराम दामोदर शानभाग ह्यांच्याशी झाले ,तिचे सासरे  कारवार मध्ये मामलतदार शानभाग म्हणून प्रसिद्ध होते ,तिच्या साखरपुड्याच्या वेळी दत्ताराम भावजी आपल्या मोठ्या बंधूंच्या घरी ताडदेवला राहत होते ,तिच्याघरी एक ससा होता ,त्या सश्यासाठी आम्ही साखरपुड्याच्या थाळ्यांमध्ये दुर्वांची जुडीही नेली होती,तेव्हाच्या प्रथेप्रमाणे मुलाच्या घरी नेलेले  बर्फीचा थाळा ,आणि अनेक प्रकारचे लाडू  अजूनही माझ्या डोळ्यासमोर दिसतात ,एका थाळ्यात आमच्या पार्ल्यातल्या बागेत लावलेली सोनटक्क्याची फुलेही आम्ही नेली होत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पंचकन्या

चेड्याचे फेणे

इंदुताई आणी गुरुदास मामा